आजपर्यंतची वाटचाल 

शिवेश्वर नागरी सह बँक वसमत 

शिवेश्वर नागरी सह बँक वसमत 

2019

वसमत मतदार संघ 

वसमत मतदार संघ 

वसमत मतदार संघ 

महाराष्ट्र विधान सभा सदस्य 

संचालक 

पुर्णा सह,साखर कारखाना मर्या.वसमत 

पुर्णा सह,साखर कारखाना मर्या.वसमत 

2017

2016

शिवेश्वर नागरी सह बँक वसमत 

शिवेश्वर नागरी सह बँक वसमत 

संचालक 

सभापती 

कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत 

कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत 

2010-2017

2012

राष्ट्रवादी काँग्रेस वसमत विधानसभा 

राष्ट्रवादी काँग्रेस वसमत विधानसभा 

अध्यक्ष 

संचालक 

रोकडेश्वर सह. सूतगिरणी मर्या. वसमत 

रोकडेश्वर सह. सूतगिरणी मर्या. वसमत 

2011

2007

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस 

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस 

सहसचिव 

सरपंच

सदस्य

ग्रामपंचायत बाभुळगाव 

ग्रामपंचायत बाभुळगाव 

विविध कार्यकारी सेवाभावी सह संस्था बाभुळगाव 

विविध कार्यकारी सेवाभावी सह संस्था बाभुळगाव 

2005

2003

राष्ट्रवादी युवा काँग्रेस वसमत 

राष्ट्रवादी युवा काँग्रेस

वसमत 

राष्ट्रवादी युवा काँग्रेस वसमत 

उपाध्यक्ष

अध्यक्ष 

राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी तालुकाध्यक्ष वसमत 

राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी तालुकाध्यक्ष वसमत 

2001

आपला माणूस (लोकनेता) आमदार चंद्रकांत रमाकांत नवघरे उर्फ राजुभैय्या  नवघरे 

आमदार चंद्रकांत नवघरे उर्फ राजुभैय्या नवघरे हे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि वसमत मतदार संघाचे आमदार आहेत.

वसमत मतदारसंघातील बाभुळगाव या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला, त्यांनी  वयाच्या 18 व्या वर्षी समाजसेवेचे राजकीय कार्य स्वीकारले आणि कमी कालावधीतच आमदारकी मिळवणारे वसमत विधानसभा मतदार संघातील पहिले युवा नेते आहेत.

२००५ मध्ये  बाभुळगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच मनून त्यांना लोकांनी स्वीकारले आणि येथूनच त्यांच्या राजकीय वाटचालीची सुरवात झाली. भारतीयांचे भविष्य त्यांच्या  गावात आहे या उक्ती प्रमाणे त्यांनी गावपातळीवर स्वबळावर काम केले आणि गावाचा विकास केला भारतात पंचायत राज व्यवस्था किती महत्वाची आहे आणि त्याला अजून कसे मजबूत करता येईल यावर त्यांनी नेहमीच पाठपुरावा केला आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सत्येचे विभाजन करून भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी त्यांना स्वतः निर्णय घेणाचा अधिकार देणे आणि राज्य आणि केंद्रसरकारच्या निधी हा कुठे आणि कश्यासाठी वापरायचा हे ठरवण्याचा अधिकार ग्रामपंचायतीलाच असले पाहिजे यावर त्यांनी बरीच जनजागृती केली . त्यांच्या कार्याची दखल शरद पवार यांनी घेऊन त्यांना २०१२ मध्ये वसमत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष म्हणून कार्यभार दिला. पुढे हि जबाबदारी त्यांनी आजपर्यंत चांगल्या प्रकारे सांभाळली.शरद पवार यांच्यासारखे नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी स्वतःला लोकसेवेसाठी समरप्रीत केले, २०११ मध्ये त्यांनी संचालक म्हणून  रोकडेश्वर सहकारी सूतगिरणी मर्या. वसमत या पदाचा कार्यभार भूषवला. एका शेतकऱ्याचा घरी जन्माला आलेल्या रज्जूभैय्या नवघरे यांनी शेतकयांच्या प्रश्नाला विधान सभेच्या पटलावर नेहमीच वाचा  फोडली आहे. एक शेतकरी असल्याने शेतकऱ्याच्या मालाला किमान हमी भाव याचा प्रश्न असो किंवा उसाच्या हंगामाचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न, शेतीला मुबलक पाणीपुरवठा, सिंचन बंधारा बांधून कसे पाण्याला प्रश्न सोडवता येईल याचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्र सरकारचा नेहमीच निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पिकहमी योजना, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाई कशी भरून काढता येईल यावर त्यांनी विधान सभेत असंख्य प्रश्न उपस्थित करून एक शेतकरी म्हणून सर्व नेत्यांना या गोष्टी वारंवार निदर्शनास आणून दिलेल्या आहेत.त्यांच्या याच कार्यामुळे त्यांनी २०१०-२०१७ च्या काळात कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत चे सभापती म्हणून कार्यभार सांभाळलेला होता. पुढे त्यांनी संचालक म्हणून २०१६ मध्ये शिवेश्वर नागरी सहकारी बँक वसमत आणि २०१७ मध्ये पुर्णा  सहकारी साखर कारखाना वसमत अश्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्यात. यासारख्या असंख्य पदांचा कार्यभार सांभाळतांना त्यांनी लोकांचे प्रश्न जवळून पाहिले आहेत लोकांनी त्यांना एक नेता म्हणून न स्वीकारता त्यांचा नेता (आपला माणूस ) म्हणूनच स्वीकारले आहे. कसल्याही पदाचा अभिमान न बाळगता त्यांनी दिवसरात्र लोकांच्या सेवेसाठी प्रयत्न केला आहे. ज्या ठिकाणी केंद्र व राज्यसरकार मदतीस अपुरे पडत असेल तर रज्जूभैय्या नी स्वतःच्या कमाईने शेतकऱ्यांना खत पुरवठा केला आहे , तसेच शेतकऱ्यांच्या मुलांचे आणि मुलींचे सामूहिक विवाह सोहळा लावून देण्याचे कार्य आजपर्यंत चालू ठेवले आहे. वसमत मतदारसंघ ग्रामीण भागात येत असल्यामुळे याठिकाणची बाजारपेठ कायमची शेतीच्या उत्पन्नावर आधारित असल्यामुळे आणि असंख्य लोकांचा मूळ व्ययसाय शेती असल्यामुळे शेतीशी निगडित असंख्य प्रश्नांना त्यांनी विधान सभेत वाचा फोडली आहे. त्यांच्या याच लोकसेवेला लोकांनी साथ देऊन त्यांना २०१९ विधान सभेच्या निवडणुकीत आमदार मानून स्वीकारले अतिशय लहान वयात वसमत मतदार संघात एक युवा आमदार मानून येथील लोकांनी त्यांना स्वीकारले. सामाजिक प्रश्न असो किंवा स्त्रियांचे प्रश्न असो ते नेहमीच सक्रियपणे सहभाग घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी महिला सबलीकरणासाठी स्वखर्चातून बर्याचश्या महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांच्या उदरनिर्वाह साठी साधन उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांना शक्षम बनवण्यासाठी शेतीसोबतच मातीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत, तसेच शेतीला पूरक जोडधंदा कसा करता येईल यासंदर्भात सतत राज्य आणि केंद्र सरकारचा निधी कसा योग्य प्रकारे वापर करता येईल यासाठी शाशकीय कार्यालयाला नेहमीच निवेदन दिले आहेत.कदाचित त्यांच्या याच कार्याचा आढावा घेऊन येथील लोकांनी त्यांना आपला नेता म्हणून  आपला माणूस म्हणून स्वीकारले आहे.

rajunavghare​

vasmat

vasmat vidhansabha

आमदार चंद्रकांत नवघरे

राजुभैय्या नवघरे

WhatsApp Image 2021-02-15 at 12.13.11 PM

RAJUBHAIYA

NAVGHARE